
- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 108 pages
- ISBN-13 : 978-93-92880-72-8
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 125g
- Dimensions : 14.5 x 1.2 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे
राजनीतीच्या अनुषंगाने विचार केला तर 'नेतृत्व' प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला अधिकाधिक वाव मिळतो आणि त्याचा लौकिक वाढण्यासही मदत होते. परंतु, अंगी गुणकौशल्यांची खाण असतानाही केवळ नेतृत्वाची संधी न लाभल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा येते. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्याबद्दलचा इतिहास हेच सांगतो.
संभाजीराजांना स्वतंत्रपणे नेतृत्व करण्याची संधी फारशी मिळालेली दिसत नाही. अपवाद फक्त शहाजीराजांना कैद झाल्याच्या घटनेचा. मुस्ताफाखानाने शहाजीराजांना कैद केल्यानंतर फर्रादखान हा सरदार संभाजीराजांच्या बेंगलोर नगरीवर चालून आला त्यावेळी प्रथमच संभाजीराजांना नेतृत्वाची धुरा स्वतंत्रपणे सांभाळण्याची संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले.
दुसरी गोष्ट अशी की, संभाजीराजे यांचे व्यक्तिमत्त्व रणांगणावरील पराक्रमाशिवाय आणखीनच खास होते. विशेष म्हणजे संस्कृतसह विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे आदींचा त्यांनी उत्तम अभ्यास केल्यामुळे त्यांचे बौद्धिक कौशल्य हे प्रभावी होते.
जयराम पिण्ड्ये नावाचा पंडित बेंगलोर येथील शहाजीराजांच्या दरबारात आश्रयास होता. तो म्हणतो, शहाजीराजांच्या पदरी सत्तरहून अधिक विद्वान लोक आपल्या कला कौशल्यात्मक गुणांचे दर्शन घडवीत असत. त्याप्रसंगी संभाजीराजे हे स्वतः अनेक पंडितांना संस्कृतमध्ये स्वरचित समस्या घालीत असत. तसेच इतर पंडितांच्या समस्यांची पूर्तीही करीत असत. वेदाजी पंडित या प्रतिभावंताने सुद्धा संभाजीराजांच्या गुणकौशल्याचे कौतुक मनापासून केले आहे. तो म्हणतो, संभाजीराजांना नृत्य, संगीत, काव्य आदी कलांमध्ये विशेष रुची होती. तसेच कवी देवदत्तच्या म्हणण्याप्रमाणे, "संभाजी हा शहाजीचा ज्येष्ठ सुपुत्र असून तो अत्यंत धोरणी, सद्गुणी, निष्ठावंत आणि देवदेवताप्रती आदराची भावना जोपासणारा असा राजपुत्र होता. त्यास राजधर्माची उत्तम जाण होती तसेच तो प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे आपल्या पित्याच्या आज्ञेत राहणारा सुपुत्र होता."
अशा या बहुगुणी आणि पराक्रमी संभाजीराजांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून समस्त इतिहासप्रेमींना निश्चितच होईल.
Please contact Lokayat Prakashan. Satara for further enquiry
Product can be shipped all over India. Delivery charges applicable depending upon the mode and location of delivery
Contact Lokayat Prakashan. Satara
at +91 8484977899राजेंद्र घाडगे
_edited.png)