
लोकायत वाचन अभियान
'लोकायत वाचन अभियान' या उपक्रमाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विवेकवादी विचार वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, महामानवांचे विचार जनमानसात पोहचावेत आणि त्याद्वारे सर्वांचे जीवन फुलून-बहरून यावे या उदात्त हेतूने हे अभियान कार्यरत आहे.
ज्येष्ठ प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रेरणेने आमचा हा प्रकाश प्रवास सुरू आहे.
अभियानांतर्गत उपक्रम
लोकायत वाचन अभियानांतर्गत खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत:
-
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या भूमिका आणि विचारांवर मान्यवर अभ्यासकांची व्याख्याने
-
पुस्तक चर्चा
-
पुस्तक परीक्षण स्पर्धा
-
वाचक प्रश्नमंजुषा स्पर्धा
-
वाचन चळवळ गतिमान करण्याचे विविध उपक्रम
अभियानाचा उद्देश
माणूस माणसापासून आणि पुस्तकांपासून दूर जात असलेल्या या काळात,
माणसाला माणसाशी आणि पुस्तकांशी जोडणे हा आमचा एकमेव हेतू आहे.
व्हॉट्सअॅप समूह
या उपक्रमातील कार्यक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोचावी म्हणून
'लोकायत वाचन अभियान' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
👉 ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
ग्रुपवर पुस्तकांशी संबंधित संदेशाव्यतिरिक्त कोणतेही मेसेज येणार नाहीत, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
काही अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.
संपर्क
राकेश साळुंखे
निमंत्रक, लोकायत वाचन अभियान
📞 8484977899
प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड
समन्वयक, लोकायत वाचन अभियान
📞 8080518085
_edited.png)

