"वस्तुनिष्ठ मराठी" या पुस्तकात भाषा आविष्काराची रूपे, संस्कृती संकल्पना, भाषांतर मीमांसा, लोकसाहित्य आणि इतर अनेक साहित्य प्रवाह, वाङ्मयेतिहास आणि वाङ्मयनिर्मिती, भाषाविज्ञान, साहित्यशास्त्र आणि भक्तिसंप्रदाय, विविध साहित्य प्रकार आणि समीक्षा पद्धती, अनेक साहित्यकृती, साहित्य संस्था, संमेलने, विविध पुरस्कार, बिरुदे, वृत्ते, अलंकार, साहित्य अवतरणे, संदर्भ ग्रंथ, टोपण नावे, मराठीतील आद्य, चूक की बरोबर, जोड्या जुळवा, प्रमाणलेखन विषयक नियम इत्यादी घटकांवरील अभ्यासपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मागील चार प्रश्नपत्रिकांचा त्यांच्या उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा आणि साहित्य या संदर्भातील वस्तुनिष्ठ माहितीचे हे एकत्रित संकलन आहे. त्यामुळे विविध विद्यापीठांच्या पदवी, पदव्युत्तर तसेच, एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. इत्यादी परीक्षांसाठी मराठीचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, मराठी विषयाचे जिज्ञासू अभ्यासक इत्यादींना या संकलनाचा चांगलाच उपयोग होईल, याची आम्हाला खात्री आहे.