- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 154pages
- ISBN-13 : 978-93-92880-64-3
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 262g
- Dimensions : 12.8 x 1.8 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
बळी
युक्रांद व छात्रभारतीचे दिवस. दारिद्रयावर मात करताना, विषमस्तरावरील मैत्री. सेवाकाळातील संघर्ष समन्वय इत्यादी छटांनीयुक्त. आर. पी. कॉलेज, उस्मानाबाद (धाराशिव) येथील शिक्षणातून उमलतांना; अर्थशास्त्राचे ख्यातनाम प्राध्यापक ना. मा. आचार्य पीयुसी (PUC) ते पदवी नि पदव्युत्तर वर्गांना नोट्सशिवाय खडू- डस्टरच्या मदतीने अत्यंत प्रभावी ज्ञानदान करत. मला ते एम. ए. अर्थशास्त्र अस्खलित इंग्रजीतून गळी उतरवत. मी पहिल्या बाकावर बसून ते ज्ञानामृत प्राशन करत असे.
त्यांनी वर्गात Multiplier Acceleration Theory शिकविली. (मर्यादित उत्पादन साधनातून अधिक उत्पादन घेण्याचा सिद्धांत). माझा कृतिशील स्वभाव असल्यामुळे मी आमच्या कुटुंबातील साधनसामग्रीचा आढावा घेतला. आमच्याकडे आठ पोती भुईमुगाच्या शेंगा, ओढ्यालगत दीड एकर शेती, आमच्या तात्यांचे विहीर खोदण्याचे कसब व संच होता. आम्ही घरच्या घरी विहीर खोदण्यास प्रारंभ केला. आठ दिवसातच पाण्याने तोंड दाखविले. जुने ऑइल इंजिन खरेदी केले. दीड एकर ऊस लावला. आज त्या विहिरीवर ३००० फूट पाइपलाइन असून आठ एकर हंगामी नि दोन एकर कायम बागायत क्षेत्र भिजते.
_edited.png)


