- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 176 pages
- ISBN-13 : 978-93-84091-46-0
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 222g
- Dimensions : 12.8 x 1.4 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर
पुरंदरेंनी कितीही आव आणला, तरी ते शिवचरित्राकडे स्वच्छ दृष्टीने पाहू शकलेले नाहीत. त्यांनी शिवचरित्र हे आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानून आपले पुस्तक लिहिले आहे, ही त्यांची सर्वांत मोठी मर्यादा आहे. एका विशिष्ट वर्गातील तरुणांना दुसऱ्या एका वर्गातील लोकांच्या विरोधात पेटून उठण्यास प्रवृत्त करावे, याच हेतूने त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत एकांगी झाले आहे.
चरित्रनायक शिवाजी महाराज हे जातिधर्मांच्या पलीकडे जाऊन आपल्या अंतःकरणात सर्वांना सामावून घेणारे आणि त्यांचे चरित्र लिहिणारा लेखक मात्र निःसंदिग्धपणे स्वजातिवर्चस्वाच्या भावनेने पुरता पछाडलेला. असा मनुष्य त्या महामानवाच्या चरित्राला न्याय कसा देऊ शकेल बरे ?
पुरंदरे, तुम्ही बहुजन समाजाला खोट्या, बदनामीकारक, कृत्रिम, नकली, बनावट, फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घकाळपर्यंत खुलवले, झुलवले आणि भुलवले - पण अस्सल आशयाने फुलवले मात्र नाही ! मानले पाहिजे तुम्हांला : आपल्या जनसमूहाचे वर्चस्व टिकवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हो तुम्ही !
_edited.png)


