- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 72 pages
- ISBN-13 : 978-93-84091-23-1
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 165g
- Dimensions : 12.8 x 0.7 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
'प्राईड' ऑफ स्वराज्य उमाजीराजे नाईक
इंग्रजांविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 'आद्य क्रांतिकारक' म्हणून उमाजी नाईक यांच्याविषयी गेली अनेक वर्षे मनात नितान्त आदर होताच. परंतु तो स्पष्ट स्वरूपात जाहीरपणे व्यक्त करण्याची संधी मला अलीकडेच एका साहित्य-संमेलनामुळे मिळाली. 'आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक भटक्या विमुक्त क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य' या संस्थेच्या पिरळे शाखेने 'आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक १ ले मराठी साहित्य संमेलन' दि. ४ जानेवारी २०१५ रोजी पिरळे येथे आयोजित केले होते. पिरळे हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये आहे. माझे नातेपुते येथील स्नेही प्रशांत सरूडकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संयोजकांनी आणि प्रशांत सरूडकरांनी मला या संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रित करून माझा गौरव केला, त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि प्रशांत सरूडकर यांचा ऋणी आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मला उमाजी नाईक यांचे चरित्र अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्याची संधी मिळाली.
_edited.png)


