- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 102pages
- ISBN-13 : 978-93-89089-51-6
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 162g
- Dimensions : 12.8 x 1.6x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
पिंपळायन
पिंपळायन ! डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या नव्या कविता संग्रहाचे हे नाव हीच एक प्रतिभानिर्मित कविता आहे. हा मार्मिक आणि अर्थपूर्ण शब्द ही काही मराठी भाषेमधील शब्दसंग्रहात पडलेली नुसतीच एका नव्या शब्दाची भर नाही, तर मराठी भाषेला अधिक सुंदर आणि अधिक समृद्ध करणारी एक काव्यात्मक नवनिर्मिती आहे !
पिंपळाकडे जाणे हे काही केवळ एखाद्या साध्या वृक्षाकडे जाणे नव्हे, तर ते बोधीकडे जाणे आहे आणि हे सूचित होते त्यांच्या पहिल्याच 'हे तथागता' या कवितेवरून ! डॉ. कस्तुरे या मूलतः एक संवेदनशील व्यक्ती आहेत आणि खरे तर म्हणूनच त्या उत्तम कवयित्री आहेत. स्वाभाविकच, त्या सुंदर सुंदर स्वप्ने पाहतात आणि समाजामध्ये ती स्वप्ने वाटतात कवितेच्या माध्यमातून. त्यांना आपल्या समाजाविषयी आणि खास करून सर्वसामान्य लोकांविषयी आत्मीयता आहे आणि त्याबरोबरच ज्या ज्या महामानव स्त्री-पुरुषांनी अशा सर्वसामान्य लोकांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत, त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आत्यंतिक कृतज्ञता आहे. तथागतांपासून, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आणि अगदी समकालीन महान व्यक्तींपर्यंत त्यांनी आपल्या मनातील कृतज्ञता आपल्या प्रस्तुत कवितांमधून व्यक्त केली आहे.
_edited.png)


