पर्यटन हा तसा माझ्या जिव्हाळ्याचा विषय ! मी जसा निसर्गात रमतो, तसाच ऐतिहासिक वास्तू-मंदिरे, गड-किल्ले, समुद्रकिनारे हे देखील माझ्या आवडीचे आहेत. पर्यटन हे माझ्या नसानसात भिनले आहे. माझ्या वडिलांनाही (डॉ. आ. ह. साळुंखे) नेहमीच नवनवीन ठिकाणी फिरायला आवडते. त्यांचा हाच वारसा माझ्याकडेही आलाय, असे मला वाटते.
देशात खूप फिरलो. विदेशातही थोडी फार भटकंती झाली. देशात फिरताना जवळपास ४ लाख कि.मी. स्वतःच्या वाहनाने स्वतः ड्रायव्हिंग करतच देशही अनुभवला. इतके फिरूनही पर्यटनाची तहान अजूनही आहेच. त्याचाच एक भाग म्हणजे हे पुस्तक...
हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला त्या प्रदेशात प्रवास करण्याची इच्छा झाली आणि त्या प्रवासासाठी या पुस्तकातील माहितीचा उपयोग झाला तर लिखाणाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल.