- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 114pages
- ISBN-13 : 978-93-89089-96-7
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 152g
- Dimensions : 12.8 x 1.8 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
देव का नाही?
काही आस्तिक लोक श्रद्धेचे समर्थन थेट करण्याऐवजी असे मांडतात की, देवाची व्याख्या करता येत नाही किंवा मानवी मनाला देव समजावून घेणे अशक्य आहे. शेवटी असे दावे 'म्हणून श्रद्धा मान्य करा' या विधानावर येतात. जर एखादी गोष्ट वर्णन करता येत नसेल किंवा समजत नसेल तर तर्कसंगत प्रश्न असा की त्यावर विश्वास तरी का ठेवायचा? वर्णन न करता येणार्या देवाची कल्पना मला खोडून काढता येणार नाही, पण तुम्हाला सिद्धही करता येणार नाही. एक उदाहरण घेऊ. मी समजा असा दावा केला की पुरातन वस्तूंचा शोध घेत असताना मला एक असे पात्र सापडले जे पूर्वी कोणी पाहिले नव्हते वा ज्ञात नव्हते. तुम्ही साहजिकच विचारणार, 'ते कसे होते सांगा म्हणजे त्याचे वर्गीकरण करता येईल', आणि मी उत्तर दिले की ते कसे दिसते ते मला अजिबात सांगता येणार नाही, तर ते कसे मान्य होणार? त्याचा आकार, रंग, जाडी, चमक, असे काही सांगितले तरच माझा दावा मान्य होणार ना? कदाचित काही लोक म्हणतील की वर्णन करता न येणे किंवा समजून घेता न येणे हा काही देव नाही असे समजण्याचा पुरेसा पुरावा होऊ शकत नाही. पण देव आहे असा खात्रीशीर पुरावा देता येत नाही, तोपर्यंत आम्ही तो नाही असे समजूनच आमचे व्यवहार चालू ठेवणार.
_edited.png)


