- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 72 pages
- ISBN-13 : 978-93-92880-36-3
- Reading age : Customer suggested age: 8 years and above
- Item Weight : 82g
- Dimensions : 18.2 x 0.5x 25.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
टीपकागद बालमनाचा
'टीपकागद बालमनाचा।' हे पुस्तक म्हणजे शिक्षकाच्या वहीत साठलेली निरीक्षणं नव्हेत, तर बालमनाच्या हृदयावर उमटलेली नितळ अक्षरं आहेत. ग्रामीण शाळेतील वर्गखोल्या, गोंदियासारख्या आदिवासी भागातील, तसेच ऊसतोड कामगारांच्या लेकरांचे जगणे, त्यांच्या हसऱ्या डोळ्यांत दडलेली स्वप्नं आणि कधी कधी गुरुजींच्याही डोळ्यांत पाणी आणणारे क्षण या साऱ्यांचा हा जिवंत दस्तऐवज आहे.
या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला बालमनाच्या नाजूक भावविश्वात घेऊन जाते; जिथे प्रश्न भोळे असतात, पण त्यामागचं शहाणपण फार खोल असतं. 'गुरुजी, तुम्ही रडताय का?' असा निरागस प्रश्न असो, मळकट वहीत दडलेलं सोनं असो, किंवा एका छोट्याशा टीपकागदावर उमटलेली मोठी भावना या सगळ्यांतून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अदृश्य, पण अतूट नातं उलगडत जातं. आईच्या पावलांनी उजळलेली शाळा, वाट पाहणारे डोळे, कानांची ओंजळ, अनुभवांचं शहाणपण, आदी पाठ तर गुरुजी आणि मुलांच्या जगण्यातला वास्तव पाठ दर्शवितात.....
हे पुस्तक शिक्षकांसाठी आरसा आहे, पालकांसाठी संवेदनशील जाणीव आहे आणि प्रत्येक वाचकासाठी स्वतःच्या शालेय आठवणींना पुन्हा जिवंत करणारा अनुभव आहे.
शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नाही, तर माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे - हे सत्य टीपकागद बालमनाचा प्रत्येक पृष्ठातून ठळकपणे समोर येते. बालमनाचा आदर करणाऱ्या, शिक्षकत्वावर प्रेम करणाऱ्या आणि शिक्षणाच्या मुळाशी जाऊन विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक हळवं, पण विचारप्रवर्तक वाचन ठरेल.
_edited.png)
