- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 228 pages
- ISBN-13 : 978-93-92880-22-3
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 282g
- Dimensions : 12.8 x 2 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
क्षमाप्रार्थना आणि कृतज्ञता
माझ्या जन्मापासून आतापर्यंत असंख्य लोकांनी मला असंख्य गोष्टी दिल्या आहेत. ही केवढी गुणसमृद्धी आणि भावसमृद्धी आहे, केवढी धन्यता आणि कृतार्थता आहे, केवढी सफलता आणि यशस्विता आहे ! माणसाला जीवनात आणि जीवनाकडून आणखी काय हवे असते बरे ! अर्थात, मी तृप्त आहे- संतृप्त आहे आणि जेव्हा या सर्वांचा निरोप घेईन, तेव्हाही तृप्त असेन-संतृप्त असेन !
मी एकदा मित्रांच्या बरोबर प्रवासात होतो. एके ठिकाणी मला एका फलकावर इंग्रजी भाषेत लिहिलेली काही वाक्ये दिसली. मला ती आवडली. हा फलक मी केव्हा व कुठे पाहिला, हे आज आठवत नाही. पण त्याचा आशय काहीसा असा होता. तुमच्याविषयी कोणी असे म्हणू नये, की 'All was beautiful here before you came.'
तुम्ही येण्यापूर्वी येथे सर्व काही सुंदर होते, या अर्थाचे हे वचन माझ्या मनात घर करून राहिले आहे. मी जेव्हा सगळ्यांचा निरोप घेईन, तेव्हा कोणाही विवेकी माणसावर माझ्याविषयी असे म्हणण्याची वेळ येऊ नये, असे माझे जगणे असावे. माझ्यामुळे ही सृष्टी किंचितशी का होईना अधिक सुंदर झालेली असो वा नसो, पण निदान माझ्यामुळे ती अधिक कुरूप झालेली असू नये आणि कुरूप झालेली असलीच, तर ती अगदी कमीत कमी कुरूप झालेली असावी. असे घडले, तर माझे जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ झाले, असे मला वाटेल !
डॉ. आ. ह. साळुंखे
_edited.png)


