- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 128 pages
- ISBN-13 : 978-93-84091-42-2
- Reading age : Customer suggested age: 08 years and above
- Item Weight : 144 g
- Dimensions : 14.5 x 1.4 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
एकपात्री प्रयोगांची मालिका क्रांतीकडून शांतीकडे
बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनवादी, तर्कशुद्धवादी, मानवतावादी, शोधकबुद्धीवादी व सुधारणावादी, संविधानातील तत्त्वांच्या चौकटीत वागण्याचा ज्यांनी ज्यांनी भारतात प्रयत्न केला त्यांना मरणाच्याच सावटाखाली जगावे लागले, यावर जगात कुणीही विश्वास ठेवणारच नाही. परंतु भारतातील हे गेली हजारों वर्षांचे व २१ व्या शतकातले देखील वास्तव आहे. परिणामी देशाने कुठल्याही क्षेत्रात जगाला धक्का दयावा असा कुठलाच शोध लावलेला नाही. ज्या अत्यंत संकुचित संस्कृतीत, मानसिकतेत, विचारांत आम्ही वाढलो त्यांना पायासहित झुगारण्याची हिंमत आम्ही - दाखविणार आहोत की नाही? सध्यातरी त्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. - ज्यांनी ज्यांनी भारतात या विचारांचा पाठपुरावा केला त्या अनेक महामानवांना अमर्याद यातना सहन कराव्याच लागल्या. प्रसंगी मृत्यूलादेखील सामारे जावे लागले. हा भारताचा इतिहास मूठभर ढोंगी, कांगावखोर, अतिरेकी, हिंसावादी, कपटी, षडयंत्री, क्रूर, विषमतावादी, उच्च-निच्चतावादी, स्वतः परके असूनही, भारतदेशच फक्त जणू काही आपल्याच बापाची जहागिर समजणारे जे अती निर्लज्ज सोडून कुणीही नाकारूच शकत नाही. हे सत्य नाकारून त्यांनी हजारों वर्षे देशाला कायम अज्ञानात अराजकतेच्या आणि दहशतवादाच्याच छायेत ठेवून विकासापासून पूर्णपणे देशाशी १००% खोटे बोलूनच वंचित ठेवले.
_edited.png)


