शककर्ते, स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री व राजमाता जिजाबाई यांचे सौभाग्य म्हणजेच राजे शहाजी महाराज होय. स्वतंत्र राज्य संकल्पनेचा प्रयत्न करणारे राजे म्हणजेच शहाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात राजे शहाजी महाराजांचा यशस्वी सहभाग होता.
राजा हा सत्तेपेक्षाही सत्याचा पुरस्कार करणारा असावा लागतो. त्यासाठी तो चारित्र्यवान आणि स्वतःपेक्षा रयतेचा, आपल्या सैन्यदलाचा विचार करणाराच असावा. तो सुशीलही असावा आणि दातृत्व जोपासणाराही असावा. तेव्हाच त्याच्याकडून राजधर्म पाळला जातो. असा "राजधर्म" पाळणारा राजा म्हणजेच "राजनीतिज्ञ शहाजी महाराज" होय.
भारतीय इतिहासातील सोनेरी पान म्हणजे शहाजी महाराजांचे हे रोमांचकारी जीवन चरित्र होय. प्रत्येक मराठी माणसाला ते दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल असा ठाम विश्वास वाटतो.