- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 192 pages
- ISBN-13 : 978-93-92880-15-5
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 225g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
आस्तिकशिरोमणी चार्वाक
₹270.00Price
चार्वाक ! भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक उमदे आणि विवेकनिष्ठ, परंतु उपेक्षित आणि तिरस्कृत दर्शन. लोकायत हे या दर्शनाचे म्हणजेच तत्त्वज्ञानाचे आणखी एक नाव. हे चार्वाकदर्शन म्हणजे एका बाजूने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक धगधगणारा निखारा. अन्यायावर व शोषणावर जबरदस्त आघात करणारी एक स्फोटक आणि जळजळीत विचारसरणी. परंतु दुसऱ्या बाजूने ज्याच्यातून आशावादाचा सुगंध दरवळत आहे, असे एक प्रसन्न, टवटवीत फूल. मानवी जीवनातील माधुर्यावर उत्कट प्रेम करायला शिकविणारी एक जिवंत विचारप्रणाली. पारलौकिक भ्रमांच्या पाठीमागे धावण्याऐवजी पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंतचे वास्तव असे मानवी जीवन, याच जगात, निकोप प्रयत्नांच्या द्वारे, निरामय आनंदाने काठोकाठ भरून टाकावे, असे सांगणारी एक इहवादी, जीवनवादी आणि आनंदवादी भूमिका.
_edited.png)


