- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 72 pages
- ISBN-13 : 978-93-84091-51-4
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 112g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
संवाद सहृदय श्रोत्यांशी
विद्रोह म्हणजे प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी वंचितांनी केलेले सर्वांगीण स्वातंत्र्ययुद्ध होय. विद्रोह म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वासांवरची, आपल्या नाडीच्या ठोक्यांवरची, आपल्या स्वत्वावरची, किंबहुना आपल्या एकूण अस्तित्वावरची अनिष्ट बंधने तोडणे, आपल्याला गुदमरवून टाकणारी दडपणे झुगारून देणे होय.... कोणावर सूड उगवणे, कोणाचा द्वेष करणे, कोणाला त्याच्या न्याय्य स्थानापासून खाली खेचून पायदळी तुडवणे, यासाठी हा विद्रोह नाही. हा विद्रोह आमच्या स्वत्वाच्या आविष्कारासाठी आहे. आमच्या उमलण्यावर लादण्यात आलेली बंधने तोडण्यासाठी आहे. आमच्या विकासाभोवती आलेली बंधने तोडण्यासाठी आहे.... आपल्यालाही बोलण्यासाठी जीभ आहे, लिहिण्यासाठी हात आहेत आणि विचार करण्यासाठी मेंदू आहे. या सगळ्यांच्या जोरावर आपली सर्जनशीलता... पणाला लावून आपणच आपले देखणे विश्व निर्माण करू या.
_edited.png)


