- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 84 pages
- ISBN-13 : 978-93-84091-90-3
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 112g
- Dimensions : 12.8 x 0.5 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
संत तुकारामांचे निवडक अभंग
‘सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ? ।।', असे संत तुकारामांचे एक विख्यात वचन आहे. ज्याने आपल्याला दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे दान आयुष्यभर अथवा पिढ्यान्पिढ्या पुरत नाही, मधेच केव्हा तरी संपून जाते, त्याचे कसले आले आहेत उपकार, असा प्रश्न तुकारामांनी उपस्थित केला आहे. याचा अर्थ, त्याच्या दानाला काही मर्यादित महत्त्व असले, तरी ते आयुष्य आरपार बदलून जाण्याइतके उत्तम असत नाही. याउलट, ज्याने आपल्याला दिलेले दान कधीच संपत नाही, त्याचे उपकार किती थोर आहेत त्याचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही, असे तुकारामांना यातून सूचित करायचे आहे. अर्थात, दुसऱ्या प्रकारच्या उपकारकर्त्या व्यक्तींविषयी सूचित केलेले हे विचार स्वतः त्यांनाही तंतोतंत लागू पडतात, याचा प्रत्यय त्यांचे अभंग वाचल्यावर सहजच येतो. त्यांचे हे अभंग माणसाला जीवनातील प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक प्रसंगात, इतरांबरोबरच्या प्रत्येक संपर्कात कोणत्या ना कोणत्या प्रकारे मार्गदर्शक ठरतात, यात शंका नाही. असे मार्गदर्शन करणारे त्यांचे निवडक पन्नास अभंग या संकलनात अंतर्भूत केलेले असून त्यांसोबत त्यांचे संक्षिप्त विवेचनहीं देण्याचा प्रयत्न केला आहे.
_edited.png)


