- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 42pages
- ISBN-13 : 978-93-92880-55-1
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 62 g
- Dimensions : 12.8 x 0.8 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
शब्दांच्या बाबतील जे खटकले, ते मांडले - भाग २
₹70.00Price
पहिल्या भागामध्ये मी अनेक शब्दांना आणि शब्दप्रयोगांना स्पर्श करू शकलो नव्हतो. त्यांचे विवेचन करता यावे, म्हणून मी हा दुसरा भाग वाचकांच्या हाती देत आहे.
माझ्या या लेखनावरून कोणी असे समजू नये, की मी भाषेला बंदिस्त करण्याचा दुराग्रह धरत आहे. वस्तुस्थिती अगदी उलट आहे. किंबहुना, भाषेला बंदिस्त करता येतच नाही, असे माझे मत आहे. कोणी कितीही अट्टहास धरला, तरी भाषेचा प्रवाह अशा कोणालाही अजिबात जुमानत नाही. भाषा हा एक वाहता निर्झर आहे. त्याच्या प्रवाहाचे पात्र कमीजास्त प्रमाणात सतत बदलत जाते, बदलत जायला हवे.
असे असले, तरी विश्वातील प्रत्येक व्यवस्थेला काही ना काही नियम पाळणे आवश्यक असते. त्याशिवाय ती व्यवस्था चालू शकणार नाही. नियमांमध्ये लवचिकपणा हवा, हे खरेच, पण त्याबरोबर इतर अनेक कारणांनी विशिष्ट नियमांचे पालन करणे, हे अत्यावश्यक ठरते.
_edited.png)


