- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 56pages
- ISBN-13 : 978-93-92880-84-1
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 92 g
- Dimensions : 12.8 x 0.8 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
श्रद्धांजली आणि गौरवांजली
जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्याचा अखंड प्रवास चालू असतो. या प्रवासात बरीवाईट असंख्य वळणे येतात. प्रत्येक वळणावर कोणी तरी नवीन भेटते. आपल्या जीवनात काही ना काही भर घालते. कोणी चालायला शिकवतात. कोणी बोलायला शिकवतात. कोणी संस्कार देतात, माहिती देतात, ज्ञान देतात. मदत करतात, उपकार करतात, धीर देतात, दिलासा देतात, आधार देतात. स्नेह देतात, प्रेम देतात, जिव्हाळा देतात, माया देतात. आनंद देतात.
लोक एवढ्याच मार्गांनी आपल्या जीवनात प्रवेश करतात, असे नाही. इतरही अनेक मार्गांनी ते आपल्या जगण्याचा भाग बनतात. आपल्या जगण्याला दिशा देतात, जीवनाला खरा अर्थ मिळवून देतात. आपले मार्गदर्शक बनतात, सोबती बनतात, साथीदार बनतात.
नुसता श्वासोच्छ्वास चालू ठेवणे म्हणजे खरे जगणे नव्हे, नुसती तहान-भूक भागवत राहणे म्हणजे खरे जगणे नव्हे, या लोकांच्या आधाराने, मदतीने आणि मुख्य म्हणजे सोबतीने चालत राहणे म्हणजे जगणे होय. कारण, हाच तर आपला जिवाभावाचा गोतावळा असतो !
_edited.png)


