
- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 142 pages
- ISBN-13 : 978-93-92880-86-5
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 215g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी
वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला, हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता, तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता. या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले, ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे धर्मसूत्रे हे वैदिक ब्राह्मणांचे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होत. ते वैदिकांनी भ्रष्ट केलेल्या पुराणांसारखे चिल्लर वा थिल्लर ग्रंथ नव्हेत. एकीकडून त्यांच्यामध्ये 'ब्राह्मण' नावाच्या ग्रंथांचे सार आले आहे, तर दुसरीकडून मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा अर्क उतरला आहे. हे ग्रंथ म्हणजे एकीकडून ब्राह्मणग्रंथांची विषसंतती आहे, तर दुसरीकडून ते मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे कृटिल आईबाप आहेत. वैदिकांचे आचार-विचार, रूढी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या ग्रंथांचे स्थान फार वरचे आहे. वैदिकांचा अहंकार, त्यांचा श्रेष्ठत्वाचा गंड, त्यांची अमानुष क्रूरता, त्यांच्या मनाचा हलकेपणा, त्यांची असंस्कृत वृत्ती इ. दुर्गुणांचे दर्शन या ग्रंथांमधून अगदी लख्खपणे घडते. ज्यांना भारताचा खराखुरा समाजशास्त्रीय इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्यांनी हे ग्रंथ जरूर नजरेखालून घातले पाहिजेत.या ग्रंथांनी बहुजनांमधील बहुसंख्य लोकांचे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण केले. त्यांना आरपार गुलाम बनवले. त्यांची संवेदना बोथट व बधिर करून टाकली. त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट केली. त्यांच्या शेकडो पिढ्यांच्या प्रतिभेचा मोहर झडेल, गळून पडेल, अशी व्यवस्था केली. या धर्मग्रंथांतील नियमांच्या विषारी विळख्यात बहुजनांतील असंख्य व्यक्तींचे प्राण गुदमरले, त्यांचे सत्त्व हरपले, त्यांची ससेहोलपट झाली. त्यांना लाचारीचे जिणे जगावे लागले आणि तरीही त्यांनी या ग्रंथांना पवित्र व पूज्य मानले. आज हे नियम वाचले, की रक्तामध्ये लाव्हारस उसळू लागतो, संतापाचा आगडोंब उफाळून येतो. तळपायाची आग मस्तकाला जाते. अशाही स्थितीत विवेक व संतुलन गमावता कामा नये वा सुडाची भावना प्रज्वलित करता कामा नये, हे अगदी खरे आहे. तथापि हा संयम बाळगताना निदान या ग्रंथांबरोबर आपली नाळ असल्याचा जो भ्रम बहुजनांच्या डोक्यात भरण्यात आला आहे, तो तरी छाटून टाकला पाहिजे. या ग्रंथांच्या आणि त्यांनी सांगितलेल्या धर्माच्या कचाट्यातून सुटून मोकळेपणाने श्वास घेतला पाहिजे. त्याबरोबरच माणसाला माणूस म्हणून उभ्या करणाऱ्या, त्याची प्रतिभा फुलवणाऱ्या, एका इद्य, निकोप, अन्यायरहित आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणाऱ्या नव्य व्यवस्थेला जन्म दिला पाहिजे. धर्मसूत्रांसारख्या ग्रंथांच्या गुलामगिरीतून सुटका करून घेऊनस्वतःच्या विवेकाच्या आधारे जीवनाची सूत्रे रचली पाहिजेत ! समाजधारणेची नवी गीते लिहिली पाहिजेत ! हे सर्व घडावे, हाच प्रस्तुत पुस्तकाच्या लेखनामागचा उद्देश आहे.होय. त्यांनी हे कृत्य संसाराला विटल्यामुळे नव्हे, तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून टाकण्यासाठी केले. अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले, हे काही लेखकांचे म्हणणेही खरे नव्हे. कारण, मी जनार्दनाकडे आलो, ते काही अन्नाला महाग झालो होतो म्हणून नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी वेदांचा अंकित नाही, भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रह्माचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे, गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्चित्त घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, असे त्यांनी म्हटले.
Please contact Lokayat Prakashan. Satara for further enquiry
Product can be shipped all over India. Delivery charges applicable depending upon the mode and location of delivery
Contact Lokayat Prakashan. Satara
at +91 8484977899
_edited.png)