- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 64 pages
- ISBN-13 : 978-93-84091-76-7
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 96g
- Dimensions : 12.8 x 0.4 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
महानिर्वाण तंत्र : स्त्रीशूद्रांचे स्वातंत्र्यही. त्यांची गुलामीची
तंत्रमार्गातील ग्रंथ, त्यातही महानिर्वाणतंत्र हा ग्रंथ आणि त्यातही त्याने सांगितलेला शैव विवाह, या संकल्पनांकडे दुरून पाहिले असता, त्या खूप मधुर आणि मनोहर वाटू शकतात. आपल्या देशातील हजारो वर्षांच्या वर्णजातिव्यवस्थेला सुरूंग लावणारी आणि स्त्रियांची गुलामगिरी संपुष्टात आणणारी सामाजिक क्रांतीची युगप्रवर्तक अशी एक विचारप्रणाली म्हणून मन तिच्याकडे आकृष्ट होण्याची दाट शक्यता आहे. या साहित्यातील काही मोजक्या वचनांतून तशा प्रकारचे विचार आढळत असल्यामुळे असा भास होणे स्वाभाविकही आहे. विशेषतः, 'शैव' विवाह म्हणजे शिवपार्वती यांचा विवाह, अशी शब्दावरूनच गल्लत झाल्यामुळे त्या संकल्पनेभोवती पावित्र्याचे एक तेजोवलय निर्माण होण्याची दाट शक्यताही आहे.
परंतु या सर्व साहित्याचे बारकाईने निरीक्षण केले असता अशा प्रकारचे भास म्हणजे एक मृगजळ आहे, हे समतेच्या विरोधात म.नि. तंत्राने केलेले असंख्य नियम पाहता सहजच ध्यानात येते. स्वाभाविकच, या ग्रंथामुळे आणि त्याने प्रतिपादिलेल्या शैव विवाहाच्या संकल्पनेने कोणतेही युगप्रवर्तक व क्रांतिकारक कार्य घडत नाही, असे मला वाटते.
आहे, हे असे आहे. आता, लोकांनीच या भूमिकेचे मूल्यमापन करावे आणि तिचा कोणता भाग स्वीकार्य आणि कोणता त्याज्य, याचा निर्णय घ्यावा. त्याज्य भाग स्वीकार्य भागाला काळवंडून टाकतो काय, यावरही विचार करावा.
_edited.png)


