- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 47 pages
- ISBN-13 : 978-93-84091-01-9
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 65 g
- Dimensions : 14.5 x 0.6 x 21.2 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
महाभारतातील स्त्रिया भाग ३
स्त्रिया अमृत असतात, असा धोशा युधिष्ठिराने म्हणजेच त्याच्या तोंडी प्रश्न घालणाऱ्या महाभारतकारांनी सतत लावलेला आहे. अमृत या शब्दाचा 'असत्य' इतका मर्यादित अर्थ नाही. 'ऋत' हा शब्द नियमांचे पालन दर्शवितो. नैतिकता, विवेक इ. सद्गुण दर्शवितो. स्वाभाविकच, 'अमृत' हा शब्द नियमांचा भंग, अनैतिकता, अनाचार, स्वैराचार वगैरे दर्शवितो. तात्पर्य, स्त्रिया अमृत म्हणजे स्वैराचारी वगैरे असतात, असे म्हणायचे आहे. 'सहधर्म' हा शब्द पति-पत्नी यांची एकमेकांवरची निष्ठा, एकमेकांच्या साहचर्यातून निर्माण झालेली त्यांची परस्परप्रीती, त्यांनी केलेले एकमेकांविषयीच्या कर्तव्याचे पालन इ. गोष्टी सुचवतो. आता, स्त्रिया जर स्वैराचारी असतील, तर त्यांच्या हातून सहधर्माचे पालन होणे शक्य नाही, असे युधिष्ठिराला वाटते. त्याने दिलेले हे कारण पूर्वग्रहदूषित आहे, हे उघडच आहे. पती आणि पत्नी यांचा मृत्यू एकावेळी घडत नाही आणि त्यामुळे मृत्यूनंतर सहधर्माचे पालन अशक्य आहे, हे त्याचे म्हणणे बरोबर आहे. परंतु दोघे जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत मात्र ते सहधर्माचे पालन करू शकतात, हे त्याने ध्यानात घेतलेले दिसत नाही.
_edited.png)


