top of page
  • Publisher : Lokvangmaya Griha
  • Language : Marathi
  • Paperback : 79 pages
  • ISBN-13 : N/A
  • Reading age : Customer suggested age: 25 years and above
  • Item Weight : 100 g
  • Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
  • Country of Origin : India
  • Generic Name : BOOK

महात्मा फुले आणि धर्म

₹70.00Price
  • १८२७-१८९० या कालखंडात होऊन गेलेले जोतीराव गोविंदराव फुले म्हणजे 'बोले तैसा चाले' या वचनाचा भारताच्या ज्ञात इतिहासातील एक उत्तम आदर्श होय. दुसरीकडे 'धर्म' ही मानवजातीच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी संकल्पना होय.

    व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हणतात. त्याच धर्तीवर व्यक्ती तितके धर्म, असेही म्हणणे शक्य आहे. याचा अर्थ आपापले अनुभव, चिंतन, उद्देश इत्यादींना अनुसरून धर्माविषयी विविध लोकांच्या विविध भूमिका असतात. त्यांपैकी परस्पर-विरुद्ध अशा दोन टोकांच्या भूमिकांचा उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल. धर्म हे सर्व दुःखांचे मूळ असल्यामुळे तो उखडून फेकून दिला पाहिजे, असे काहींना वाटत असते. 'धर्म' हा शब्द कानांवर पडला, तरी या लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. याउलट, धर्म हा समाजधारणा करीत असल्यामुळे प्रसंगी आपले वा दुसऱ्याचे रक्त सांडूनही त्याचे रक्षण केले पाहिजे, असे काहींना वाटत असते. 'धर्म' हा शब्द कानांवर पडला, तरी त्यांच्या चित्तवृत्ती उल्लसित होतात, उत्तेजित होतात. या दोन भूमिकांच्या मधे आणखी असंख्य भूमिका असतात. आपल्यापुढे आता प्रश्न आहे, तो असा : यांपैकी महात्मा फुल्यांची धर्माविषयीची भूमिका नेमकी कोणती होती?

    फुल्यांच्या मनात आदर्श कल्याणकारक धर्माची जी काही कल्पना होती, तिला अनुसरून त्यांनी लोकांपुढे 'सार्वजनिक सत्यधर्म' ठेवला. आपल्या देशातील शूद्रादी अतिशूद्रांसह ब्राह्मणांनीही तो स्वीकारावा, असे तर त्यांना वाटत होतेच. तसेच, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादींनीदेखील तो स्वीकारावा, अशी त्यांची इच्छा होती. एक तर तो त्यांच्या दृष्टीने सर्व मानव स्त्री-पुरुषांच्या हिताचा होता. दुसरे म्हणजे सर्व मानवांचा एकच धर्म असावा, असे त्यांना वाटत होते. ईश्वराने पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि वायू हे जर एक-एकच केले आहेत, तर 'मानवांचे साठी बहु धर्म कसे' असा प्रश्न त्यांनी विचाराला आहे. 'धर्मराज्यभेद मानवा नसावे', 'मानवांचे धर्म नसावे अनेक', 'मानवांचा धर्म एकच असावा' इत्यादी वचनांतून त्यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे. सर्वांनी जो एकच धर्म स्वीकारायचा, तो अर्थातच 'सत्यधर्म' होय. ते म्हणतात, 'सत्यावीण नाही जगी अन्य धर्म'.

Lokayat%20Logo%20New1%20(1)_edited.png

Our website is undergoing maintenance to serve you better.
We apologize for the inconvenience and appreciate your patience.

bottom of page