- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 80pages
- ISBN-13 : 978-93-84091-29-3
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 82g
- Dimensions : 12.8 x 0.6 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
मित्रांना शत्रू करू नका !
₹100.00Price
समजा, दहा हजार फूट उंचीचा एक पहाड आहे. त्याच्या पायथ्यापासून वीस किलो वजनाची साखरेची एक गोणी आपल्याला त्याच्या शिखरापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आपल्याला खूप श्रम करावे लागतील. किती तरी वेळ द्यावा लागेल. चिकाटीनं आणि आशावादी आत्मविश्वासानं सगळा चढ चढावा लागेल. त्यानंतरच आपण ती गोणी शिखरावर पोचवू शकू. आता, ती गोणी तिथून दहा हजार फूट खाली टाकायची असेल, तर मात्र यातलं काहीही आवश्यक नाही. तिला थोडंसं ढकललं, की ती क्षणार्धात आपोआप खाली कोसळते. मैत्रीसारख्या नात्यांचंही असंच आहे. ती जोडायला, वाढवायला, जपायला खूप खूप काही आवश्यक असतं. ती मोडायला, संपवायला एखादा शब्द, एखादं पाऊल, एखादा क्षण पुरेसा होतो. ती जपली, तर जीवनाचा जमाखर्च फायद्याचा, नाही तर ... ?
_edited.png)


