- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 448 pages
- ISBN-13 : 978-93-84091-93-4
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 522g
- Dimensions : 12.8 x 4.5 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
बळीवंश
आणि आमचा लाडका बळीराजा ? तो तर तत्त्वदर्शिनी बुद्धी असलेला बुद्ध. प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. स्वतः सर्वांशी समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी. यज्ञयागांच्या भ्रामक कर्मकांडाऐवजी निर्मितिगर्भ कृषीला जपणारा बळीराजा. वैदिकांची शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार. कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव. काही व्यक्ती व समूह यांचा अपवाद वगळता इतरांनी आपल्या हृदयासनावर प्रेममंत्राने अभिषिक्त केलेला आणि सम्यक राज्यकर्ता असलेला सम्-राज - सम्राट. पराभवातही पराभूत न होणारा शांतचित्त तत्त्ववेत्ता. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग. इतका जिवलग, इतका जिवलग की सात काळजांच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग !
_edited.png)


