- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 82pages
- ISBN-13 : 978-93-92880-89-6
- Reading age : Customer suggested age: 20 years and above
- Item Weight : 172g
- Dimensions : 12.8 x 1.2x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
प्राचीन सातारा
'सातारा' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती स्वराज्याची चौथी राजधानी. मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासात शिवप्रतापाच्या जाज्वल्य खुणा मिरवणारी 'अजिंक्य' भूमी आणि त्याचबरोबर स्वराज्याचं मराठा साम्राज्यात रूपांतर करणारं केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारा हा जिल्हा. अजस्त्र सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या मिरवत कित्येक बुलंद गडकोटांची साक्ष देणारा हा प्रदेश. कृष्णा-कोयना सारख्या नद्यांनी समृद्ध केलेली, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण लाभलेली ही वैभवशाली माती. मात्र या सगळ्याला एक महत्त्वपूर्ण जोड लाभली आहे, ती म्हणजे या भूमीच्या प्राचीनतेची. प्रागैतिहासिक काळापासूनचा इतिहास मिरवणारा हा भूप्रदेश नेमका कसा होता शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? या भूमीवर नांदलेल्या राजसत्ता, निर्मिलेल्या अद्वितीय वास्तू, तत्कालीन लोकजीवन, संस्कृती, व्यापार अन् इथल्या कलेतिहासाच्या संपन्न ठेव्यात सामावलेल्या इतिहास कथांद्वारे घेतलेला हा मागोवा, म्हणजेच 'प्राचीन सातारा'!
_edited.png)


