- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 144 pages
- ISBN-13 : 978-93-84091-03-3
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 155g
- Dimensions : 12.8 x 2 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
जगणे बदलून टाकणारे, बुद्धांचे मंगलसुत्त
प्रत्येकाचे जीवन जास्तीत जास्त सुरक्षित, दुःखमुक्त आणि आनंदमय व्हावे, अशी तळमळ बुद्धांच्या मनात सदैव वसत होती. त्यांनी पंचेचाळीस वर्षे चारिका केली, ती प्रत्येकाचे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन मांगल्याने ओतप्रोत भरून जावे, या उद्देशानेच ! माणसाने कोणते आचरण केले असता त्याला पराजयाचा वा न्हासाचा क्लेशकारक अनुभव घ्यावा लागणार नाही, हे कळावे म्हणून त्यांनी मंगलसुत्ताचा उपदेश केला. प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखाव्या, कर्तव्ये पार पाडावी, सद्गुण आत्मसात करावेत, हा त्यांचा उपदेश होता. सध्याच्या बदलत्या जगामध्ये, स्वागतार्ह अशी भौतिक प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूने माणसे मात्र एकमेकांना दुरावू लागली आहेत. कुटुंबांची घडी विस्कटू लागली आहे. निखळ मैत्रीची जागा स्वार्थी व्यवहाराने घेतल्याची उदाहरणे वाढत आहेत. खूप जण व्यसनांच्या कचाट्यात सापडून उद्ध्वस्त होत आहेत. गरजेपेक्षा किती तरी जास्त मिळाल्यानंतरही माणसांची मने अतृप्त, असमाधानी, अस्वस्थ, बेचैन आहेत. कित्येक लोक आपल्या किरकोळ स्वार्थासाठी वा छोट्याशा अहंकारासाठी दुसऱ्याला माणसांतून उठवण्याच्या थराला जात आहेत. या गोष्टींना अपवाद आहेत आणि अशा अनिष्ट गोष्टी पूर्वीही घडत होत्या, हे खरे असले, तरी अलीकडच्या काळात अशा गोष्टींची व्याप्ती, प्रमाण आणि तीव्रता अधिकच वाढत असताना दिसत आहे. अशा काळात बुद्धांचे मंगलसुत्त माणसाला त्याच्या अस्सल माणूसपणाची आठवण करून देत आहे. त्याला खराखुरा माणूस म्हणून कसे जगावे आणि सर्वत्र अपराजित कसे रहावे, याचे प्रशिक्षण देत आहे. असे असल्यामुळे या सुत्ताला वर्तमान काळाचे संदर्भमूल्य आहे. स्वतः बुद्धांच्या काळातही त्याची गरज होतीच, पण आज कदाचित त्याची उपयुक्तता पूर्वीपेक्षा फार फार अधिक आहे !
_edited.png)


