top of page
  • Publisher : Lokayat Prakashan
  • Language :  Marathi
  • Paperback : 24 pages
  • ISBN-13 : 978-93-84091-86-6
  • Reading age : Customer suggested age: 20 years and above
  • Item Weight : 35 g
  • Dimensions : 14.5 x 0.6 x 21.2 cm
  • Country of Origin : India
  • Generic Name : BOOK

चार्वाक दर्शन (पुस्तिका)

₹40.00Price
  • चार्वाकदर्शन ही एक जीवनदृष्टी आहे. जीवन सम्यक रीतीने जगण्याची एक विज्ञाननिष्ठ पद्धत आहे. या दर्शनानुसार जीवन ही एक वस्तुस्थिती आहे, स्वप्न वा भ्रम नव्हे. जीवनातील समस्या सोडवावयाच्या असतात, लपवावयाच्या नसतात. या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणाने त्यांना सामोरे जावयाचे असते, त्यांच्यापासून दूर पळावयाचे नसते. म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करताना चार्वाकदर्शनाने खोटी प्रतिष्ठा, दुटप्पीपणा इत्यादींना थारा न देता प्रत्येक वेळी वास्तववादी, जीवनवादी भूमिका स्वीकारली. मानवी शरीर एकदा नष्ट झाले, की पुन्हा प्राप्त होत नसते; म्हणूनच प्राप्त झालेल्या शरीराचा शहाणपणाने जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत, मरण्यासाठी नव्हे. मृत्यू हा अटळ असेल, परंतु म्हणून काही तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही. जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पारलौकिक वा कल्पित अशा अतिमानवी शक्तींचा आश्रय घेण्याची गरज नाही. मानवनिर्मित आणि विवेकाधिष्ठित समाजव्यवस्था या उद्देशाची पूर्ती करू शकेल. चार्वाकदर्शन हे असे आहे-वास्तववादी, जीवनवादी, मानववादी !

Lokayat%20Logo%20New1%20(1)_edited.png

Our website is undergoing maintenance to serve you better.
We apologize for the inconvenience and appreciate your patience.

bottom of page