- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 110 pages
- ISBN-13 : 978-93-84091-28-6
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 225g
- Dimensions : 12.8 x 0.7 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
गुढी आणि शंकरपार्वती
मी आपल्या हाती आता जे पुस्तक देत आहे, त्या प्रकारचे लेखन मी करेन वा मला करावे लागेल, असे मला कधी वाटले नव्हते. तथापि आपल्या सणांच्या बाबतीत सध्या समाजाच्या काही वर्तुळांतून मोठ्या त्वेषाने ज्या चर्चा चालू आहेत, त्या पाहता गुढीविषयी मला उपलब्ध असलेली माहिती समाजापुढे ठेवणे माझे कर्तव्य आहे, असे जाणवल्यामुळे मी हे लेखन समाजाला सादर करीत आहे. आवश्यकता निर्माण झाली, तर या पुस्तकाचा दुसरा भाग लिहून आणखी काही विवेचन मी त्या भागात करीन.
गुढी उभी करावी की करू नये, करायची असल्यास कशी करावी, करायची नसल्यास कोणता दृष्टिकोण घ्यावा, याविषयी मला येथे काहीही म्हणायचे वा सांगायचे नाही. मी कोणत्याही प्रकारच्या चाकोरीबद्ध कर्मकांडाचा समर्थक नाही. इतिहास जे सांगतो, ते समाजापुढे ठेवावे, एवढी नम्र भावना घेऊन मी हे लिहीत आहे. गुढीमागचे सत्य काय हा मुद्दा वादासाठी बाजूला ठेवला, तरी चैत्र शुक्ल प्रतिपदेला तरी काही सांस्कृतिक महत्त्व आहे काय, याचा थोडा-बहुत शोध घ्यायला हरकत नाही, असे मला वाटते.
_edited.png)


