- Publisher : Lokayat Prakashan
- Language : Marathi
- Paperback : 56 pages
- ISBN-13 : 978-93-84091-16-3
- Reading age : Customer suggested age: 25 years and above
- Item Weight : 100g
- Dimensions : 12.8 x 2.1 x 19.8 cm
- Country of Origin : India
- Generic Name : BOOK
अशी भेटत रहा तू
₹80.00Price
‘अशी भेटत रहा तू' या शीर्षकानं जे काही लिहिलं गेलं आहे, ते उचित आहे की नाही, याची मला कल्पना नाही. गंभीर स्वरूपाचं वैचारिक लेखन करणारानं अशा प्रकारे आपल्या व्यक्तिगत भावनांमधे गुंतणं योग्य नव्हे, असं कुणाचं प्रामाणिक मत असू शकतं. अशा प्रकारचं मत बाळगणाऱ्या कुणाचाही अनादर करण्याची माझी भूमिका नाही.
तथापि, हे लेखन होणं ही माझी एक मोठी मानसिक गरज होती, हे मात्र खरं आहे. कारण, या लेखनातील व्यक्तिगत भावनांना व्यक्तिपलीकडचा काही आशयही आहे. वरवर पाहता मी हे सगळं स्वतःच्या पत्नीविषयी - स्मृतिशेष मधुश्रीविषयी लिहिल्यासारखं वाटत असलं, तरी वस्तुतः ते माझ्या सर्व धडपडीला पाठबळ देणाऱ्या प्रेरणेविषयी आहे. ती प्रेरणा माझ्या पत्नीच्या स्वरूपात आहे, इतकंच.
_edited.png)


